मुद्दा परिक्षेचा !!

मुद्दा परिक्षेचा !!

 

वे सकाची.. चिरंजीवानी उठल्या उठल्याच सुरू केल, “काय आहे आमच नशीब ! हयावेलळेस देखील आमची परीक्षा नाही. वर्षभराच्या आमच्या performance वर म्हणे मूल्यांकन करणार आहेत, छे .. आमच्याकड़े नवीन मार्ग/ उपाय नाहीत का ? कोरोनाच जागतिक संकट जशा पद्धतीने परदेशात तोंड दिले जाते आहे त्याचप्रमाणात नाही तर थोड्या फार प्रमाणात आपण नाही करू शकत?  वर्षभर ऑनलाइन म्हणून फी भरून सगळे वर्ग केले, यूनिट टेस्ट, मिड टर्म, प्रिलिम १, 2, ३ दिल्या आणि आता परीक्षाच घेणार नहित? वर्षभर कशाला एवढी नाटक?”.. असे एक ना अनेक प्रश्न यांचा भड़ीमार सकालीच सुरू झाल्यावर काय कराव आणि आलेला चेंडू कसा खेळायचा ह्याचा विचार करण्याची संधि देखील दिसत नव्हती.  “ठीक आहे बोर्डाची परीक्षा नाही तर मग कमीत कमी ह्या शाळानी नको का घ्यायला का? ऑफ़लाइन नाही शक्य तर ऑनलाईन तर खर?”  शेवटी चिडलो आणि म्हटल  “ जरा शांत, उगाच आपल्याला खूप कतय ह्या अविर्भावात बोलू नकोस.”  थोडासा हिरमुसला पण गप्प झाला. प्रत्येक घरात थोड्या फार प्रमाणात अशाच पद्धतीने घडणारा संवाद.  काय असेल ह्या समस्येच उत्तर अकरावीच्या प्रवेशासाठी शाळानी ऑनलाइन गर्दी सुरू केली आहे, पण खरंच ह्या मुलांच काय भविष्य.

 

खरंच विचार करायला आणि स्वतःला अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न आहे. यंदा १० वी ची परीक्षा नाही? हा एक परमाणु बॉम्ब असल्यासारख वाटत. वर्षभर ज्या होतकरु मुलानी मेहनत घेतली आहे ज्याची परिस्थिति आहे ते आणि ज्या मुलानी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास केलाय त्यांच काय?  यक्ष प्रश्न आहे.  हे वयच अवघड आहे आणि हयात आशाप्रकारचे निर्णय म्हणजे काही मुलांच्या बाबतीत खरंच खूप भयंकर परिणाम घडवणारे आहेत.  कोवळ्या वयातील मुलाना समजून घेण खरंच अवघड असते.

 

कोणताही निर्णय कोरोना ह्या एकाच निकशावर घेताना मुलांचा, त्यांच्या भावनिक परिस्थितिचा आणि ह्या निर्णयाने होनारे दूरगामी परिणाम यांचा विचार होणे खूप आवश्यक आहे. परीक्षा न घेण्यापेक्षा ज्या पद्धतीने ऑनलाइन शाळा चालवल्या त्याचप्रमाणे वार्षिक परिक्षेचा विचार होणे देखील आवश्यक आहे. मलातरी वाटत की शाळानी ऑफलाइन पद्धतीने शासनाच्या निर्णयानुसार नियमाच्या चौकटीतच Social Distancing, Mask, Sanitization हे सग सांभालून प्रत्येक वर्गात किमानपक्षी २५-३० मुले ह्या पद्धतीने  ऑफलाइन ह्या वर्गात देखील परीक्षा घेऊ शकतात.  ज्या पालकाना खरोखरच मुलांच्या मानसिकतेचा विचार आहे ते ह्या विषयावर तयार व्हायला हवेत. सध्याच्या वर्क फ्रॉम होम पद्धतित स्वताच्या मुलाला शाळेत नेणे आणि तेथून आणणे हे सहजच शक्य आहे.

 

शेवटी माझ्या मुलगा ही माझी देखील एक जवाबदारी आहे, ही माझी राष्ट्रीय जवाबदारी देखील आहे.  भविष्य आहेत ही मूल आपली. आपल्यासमोर ह्या मुलांच्या भविश्याचे होणारे हाल बघून शांत बसवत नाही.  स्वतःवरून थोडासा विचार करा आपल्या सर्वांची प्रत्येक वर्षाची प्रगति पुस्तकाची एक स्वतंत्र फाइल आहे .... भविष्यात ह्या मुलांची काय?  आयुष्यातल्या दोन वर्षाच्या प्रगति पुस्तकावर कोरोना चा शिक्का.... आपण स्वतःच विचर करण्यासारखी गोष्ट आहे. मान्य आहे भोवतालची परिस्थिति बघता शासनाला देखील नाइलाजास्तव असे निर्णय घ्यावे लागता आहेत पण मी जसा एक सजग भारतीय नागरिक आहे असे आम्ही स्वतः समजतो तसे आम्ही एक सजग पालक देखील होऊयात आणि आज कोरोनाच्या आगीत होरपलून निघत असलेल्या ह्या मुलांचा भविष्यकाल एक उत्कृष्ठत्व घेऊन निर्माण करू या.  दोन  वर्ष कमी नाहीत, शाळा नाही, खे नाही, सहली नाहीत, मित्राच्या भेटी नाहीत, शाळेचे वातावरण नाही, शाळेची पहिली घंटा नाही, जन गण मन नाही, त्यानंतरचे आठ तास नाहीत, मधली सुट्टी नाही, मधल्या सुट्टीतील भांडण, एकत्र डबे खाण, खोडया काढण ह्या सगळ्यालाच मुकली आहेत ही मूल.  त्यांच्या मानसिक स्थितिवर झालेला हा प्रचंड आघात आहे.   म्हणून एक पालक म्हणून हे समजून घेण आवश्यक आहे.  परीक्षा ही हवीच त्यानंतरच शासनाने अकरावीच्या प्रवेक्षाबाबत निर्णय घ्यावा.  प्रत्येक सजग पालकाने ऑफलाइन परिक्षेसाठी आवश्यक असलेली सम्पूर्ण सुरक्षेची जवाबदारी घेऊन केवल परिक्षेच्या निकशावरच अकरावी प्रवेश घ्यावा. 

Comments